चार लाखांची लाकडे जप्त; छत्तीसगड राज्यात तस्करीचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:28 PM2023-09-16T18:28:26+5:302023-09-16T18:28:37+5:30
लाकडांची किंमत ३ लाख ५७ हजार ९८१ रूपये एवढी आहे. सदर लाकडे जप्त करण्यात आली आहेत.
गडचिराेली : वनविभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या देचलीपेठा वन परीक्षेत्रातील दुर्गम भागातील कोंजेड नाल्यात सागवानी लाकडे लपवून ठेवली असल्याची गाेपनीय माहिती मिळताच उप वनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाने कारवाई केली. यात ३ लाख ५७ हजार ९८१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देचलीपेठाचे वन परीक्षेत्रअधिकारी सागर बारसागडे, क्षेत्र सहाय्यक एल.एम. शेख, वनरक्षक सुरज नारनवरे, ए. आय. मटामी, सुधाकर गावडे यांनी शुक्रवारी शोधमोहीम राबवली असता कोंजेड नाल्यात सागवानाची लाकडे बांधून तराफे बनवून ठेवल्याचे दिसून आले. सदर लाकडे वन विभागाने ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली आहे.
लाकडांची किंमत ३ लाख ५७ हजार ९८१ रूपये एवढी आहे. सदर लाकडे जप्त करण्यात आली आहेत. यातील आराेपीचा शाेध घेतला जात आहे. काेंजेड नाल्यानंतर जवळच छत्तीसगड राज्याची सीमा लागू हाेते. पुढे ही लाकडे छत्तीसगड राज्यात नेली जाणार हाेती.