चार टक्के शिक्षक अजूनही लसीपासून दूर; विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:06+5:302021-09-09T04:44:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे राज्य शासन प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे राज्य शासन प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने काेराेना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबर २०२१ ची डेडलाइन दिली हाेती. ही डेडलाइन संपून दाेन ते तीन दिवस उलटत आहेत. तरी जिल्ह्यातील जवळपास चार टक्के शिक्षक काेराेना लस घेण्यापासून दूर आहेत. काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही काेराेनाची लस घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा सवाल पालकांकडून उपस्थित हाेत आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शहरी भाग वगळता सर्वत्र या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू हाेताना शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काेराेना चाचणीसह काेराेना लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही चार टक्के शिक्षकांनी काेराेनाची लस घेतली नाही. बऱ्याच शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डाेस घेतला आहे.
बाॅक्स....
माध्यमिक विभाग
एकूण शिक्षक - ४,२००
लस घेतलेले शिक्षक - ४,१००
कर्मचारी - १,७५०
लस घेतलेले कर्मचारी - १,७१०
..................
प्राथमिक विभाग
एकूण शिक्षक - ३,८००
लस घेतलेले शिक्षक - ३,७५५
कर्मचारी - ४३
लस घेतलेले कर्मचारी - ४०
काेट...
शासनाच्या निर्देशानुसार ५ सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काेराेना लसीकरण करून घेणे आवश्यक हाेते. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे. केवळ चार टक्के शिक्षक व काही कर्मचारी लस घेण्यापासून दूर आहेत. आपण ४ सप्टेंबरला सर्व मुख्याध्यापकांना सूचना करून काेराेना लसीकरणाबाबतची माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. पाेळा सणाची सुटी आल्याने ही माहिती १०० टक्के प्राप्त झाली नाही. येत्या दाेन दिवसांत हा डेटा प्राप्त हाेणार आहे. त्यानंतरच लस न घेतलेल्यांचे तंताेतंत आकडे मिळतील.
-आर.पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली
..............
.
शासनाने संपूर्ण खबरदारी घेऊन प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. मात्र, त्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काेराेना लसीकरण करणे महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण सुरक्षितता असेल, तरच पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास घाबरणार नाहीत.
-पांडुरंग वेलादी, पालक
बाॅक्स...
१८८ जणांची लसीकरणाकडे पाठ
माध्यमिक विभागातील १०० शिक्षक व ४५ कर्मचारी, असे एकूण १४५ जणांनी काेराेनाची लस घेतली नाही. प्राथमिक विभागांतर्गत कार्यरत ४० शिक्षक व तीन कर्मचारी, अशा एकूण ४३ जणांनी अजूनही लस घेतली नाही. जिल्ह्यात शिक्षक, कर्मचारी मिळून एकूण १८८ जणांनी सध्यातरी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. याचे कारण अनेक असू शकतात. यामध्ये विविध आजार व जुन्या व्याधी राहू शकतात.