वृक्षतोड प्रकरणी चार ट्रॅक्टर पकडले

By admin | Published: September 12, 2016 02:01 AM2016-09-12T02:01:34+5:302016-09-12T02:01:34+5:30

सिरोंचा नजीकच्या राजीवनगर (ब्राह्मणपल्ली) येथील खंड क्रमांक २५ च्या जंगल परिसरात शासकीय जमिनीवर

Four tractors caught in the tree trunk case | वृक्षतोड प्रकरणी चार ट्रॅक्टर पकडले

वृक्षतोड प्रकरणी चार ट्रॅक्टर पकडले

Next

शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण : वनाधिकाऱ्यांची अतिक्रमणधारकांवर कारवाई
सिरोंचा : सिरोंचा नजीकच्या राजीवनगर (ब्राह्मणपल्ली) येथील खंड क्रमांक २५ च्या जंगल परिसरात शासकीय जमिनीवर अवैधरित्या चार ट्रॅक्टरद्वारे झाडे झुडूपे तोडून जंगल साफ करीत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच वनाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून चार ट्रॅक्टर चौकशीसाठी वन कार्यालयात जमा केले आहे.
या प्रकरणी मदनय्या दुर्गय्या जिल्लापेल्ली रा. मेडाराम माल व अंकमल्लू मेडिजर्ला रा. राजीवनगर या दोन आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ (१), क, ३२ (ग) ९२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिरोंचाच्या वन परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये एमएच ३३ एफ ८८०९, एमएच ३३ एफ ८५१, एमएच ३३ एफ ७८४ व एमएच ३३ एल ५७९२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. सदर कारवाई सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी नरखेडकर, वनपाल तुम्मावार, वनरक्षक इरकीवार, फिरत्या पथकाचे कर्मचारी खरतड आदींनी पार पाडली. या प्रकरणाचा तपास सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी नरखेडकर करीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी वनजमिनीवर अतिक्रमण केल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Four tractors caught in the tree trunk case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.