तेंदू संकलनातून चार गावांना मिळाले ४० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:00 AM2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:54+5:30

कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला.

Four villages got Rs 40 lakh from Tendu collection | तेंदू संकलनातून चार गावांना मिळाले ४० लाख

तेंदू संकलनातून चार गावांना मिळाले ४० लाख

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । लॉकडाऊनच्या काळात ग्रामसभेच्या पुढाकाराने नऊ दिवसासाठी मिळाला होता रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : वनहक्क कायद्यानुसार गठीत करण्यात आलेल्या गु्रप ऑफ ग्रामसभामध्ये १० महसुली गावे समाविष्ट आहेत. यापैकी चार गावांनी लॉकडाऊनच्या काळात नऊ दिवसांत तेंदूपत्ता संकलन करून ४०.४२ लाख रुपये मिळविले. यातून चार गावातील ५६८ कुटुंबांना रोजगार मिळाला होता. सरासरी ७ ते १४ हजार रुपये प्रती कुटुंबाला मिळाले.
कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. परंतु तालुक्यातील ग्रामसभेच्या पुढाकाराने तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यात आले. ग्रुप ऑफ ग्रामसभा कुरखेडामध्ये एकूण १० महसुली गावे समाविष्ट आहेत. यापैकी चार गावातील ५६८ कुटुंबांनी तेंदूपत्ता संकलन करीत नऊ दिवसांत ४० लाख ४२ हजार रुपये मिळविले. विशेष म्हणजे, तेंदू संकलनाची परवानगी मिळावी यासाठी सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती. राज्याच्या मुख्य सचिवांनी १५ एप्रिल रोजी राज्यातील वन व वनेत्तर क्षेत्रातून तेंदूपाने व इतर वनोपज गोळा करून विक्री करण्याची परवानगी दिली. याचा लाभ गरीब गरजू, भूमीहीन नागरिकांना झाला. वनहक्क प्राप्त गावातील ग्रामसभा व गु्रप ग्रामसभांना तेंदूपाने गोळा करून विक्री करणे शक्य झाले. चार गावातील नागरिकांनी एकूण ९ लाख ५१ हजार ७० तेंदूपुडे संकलित करून ४ हजार ४०० रुपये प्रती गोणी प्रमाणे विक्री केली. यात १ हजार १८६ पुरूष व १ हजार २६४ महिलांचा सहभाग होता. या गावांमध्ये ७५ टक्के आदिवासी कुटुंब असून त्यांना संचारबंदीतही रोजगार मिळाला.

कृषी निविष्ठा खरेदीसाठी उपयोग
दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम जिल्ह्यातील गावांमध्ये केले जाते. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. यातून प्राप्त झालेल्या पैशाचा वापर शेतकरी खरीप हंगामात बियाणे, खते, नांगरणी, मजुरीकरिता करतात. स्थानिक लोकांना वनहक्कामुळे मालकी हक्क प्राप्त असल्याने वनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले आहे. याचा सदुपयोग अनेक गावातील नागरिक करीत असल्याचे दिसून येते.

खुटकटाई बंदीमुळे तेंदूचे संवर्धन
ग्रामसभांना वनहक्क कायद्यानुसार विशेष अधिकार प्राप्त असल्याने जंगलाचे संरक्षण, संवर्धन अनेक ग्रामसभा करतात. पूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात तेंदू हंगामापूर्वी तेंदू झाडांची खूटकटाई संबंधित कंत्राटदारांकडून केली जायची. नवीन पालवी यावी, हा यामागील उद्देश होता. परंतु दरवर्षी खूटकटाईमुळे अनेक झाडांची अवैध तोड होऊन झाडांची संख्या झपाट्याने घटत होती. पर्यायाने जंगलाचाही ºहास व्हायचा. परंतु ग्रामसभांनी खूटकटाईवर बंदी घातल्याने तेंदूच्या झाडांचे संवर्धन होत आहे. यासाठी तेंदूपत्ता विक्री निविदा काढताना याबाबतची अट घातली जाते. त्यामुळे तेंदूचे संवर्धन होऊन वनातील झाडांची घनता वाढण्यास मदत होत आहे.

Web Title: Four villages got Rs 40 lakh from Tendu collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.