साकोलीचे आमदार घेणार चार गावे दत्तक

By admin | Published: May 22, 2016 01:02 AM2016-05-22T01:02:22+5:302016-05-22T01:02:22+5:30

भंडारा जिल्ह्याच्या साकोलीचे भाजप आमदार बाळ काशीवार यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिसंवेदनशील बोडूकसा, ...

Four villages will be adopted for Sakoli MLAs | साकोलीचे आमदार घेणार चार गावे दत्तक

साकोलीचे आमदार घेणार चार गावे दत्तक

Next

सिरोंचा तालुका : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केली घोषणा
सिरोंचा : भंडारा जिल्ह्याच्या साकोलीचे भाजप आमदार बाळ काशीवार यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिसंवेदनशील बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम हे चार गाव दत्तक घेण्याचा निर्णय २० मे रोजी सिरोंचा येथे जाहीर केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील भाजप आमदार दुष्काळग्रस्त गावांना भेटी देत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साकोलीचे आमदार बाळ काशीवार १९ मे रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी या भागातील रूग्णालय, बँका आदींना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणली. याशिवाय त्यांनी काही गावांनाही भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आ. काशीवार यांनी प्रभारी तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांना चार गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. पंचायत समितीत त्यांनी आढावा बैठक घेऊन लोकांच्या समस्या त्वरित निकाली काढा, अशा सूचना केल्या. सिरोंचा येथील बँकेची पाहणी करून बँक अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या. शेतकऱ्यांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सक्षमतेने पोहोचवा, असे ते बँक अधिकाऱ्यांना म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम हे गाव आपण दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले व याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरिगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, शहर प्रभारी रमेश मारगौनी, बानय्या बेडके, अटला, सत्यनारायण मंचालवार, रवी गुडीमेटला आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Four villages will be adopted for Sakoli MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.