दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:55 AM2018-03-11T00:55:20+5:302018-03-11T00:55:20+5:30

देलनवाडी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयापासून एक किमी अंतरावर देलनवाडी-उराडी मार्गावर दारूची तस्करी करणारे चारचाकी वाहन शुक्रवारच्या मध्यरात्री उलटले. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे.

The four-wheelchair transport vehicle turned down | दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटले

दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटले

Next
ठळक मुद्देदेलनवाडी गावाजवळील घटना

ऑनलाईन लोकमत
वैरागड : देलनवाडी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयापासून एक किमी अंतरावर देलनवाडी-उराडी मार्गावर दारूची तस्करी करणारे चारचाकी वाहन शुक्रवारच्या मध्यरात्री उलटले. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. मात्र त्याचे नाव कळले नाही.
बोलेरो पीकअप कंपनीचे मिनी ट्रक उराडीमार्गे देलनवाडीच्या दिशेने येत होते. या वाहनाच्या समोरचा टायर फुटल्याने सदर वाहन बरेच दूर फरफटत गेले व या रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. वाहनाच्या मागच्या चाकाचा रॉड सुध्दा तुटला आहे. अपघातानंतर वाहनातील दारूच्या बॉटल फुटल्याने. या ठिकाणी बॉटलचा खच पडला आहे. काही दारू दुसºया वाहनात टाकून रात्रीच नेण्यात आली. अपघातग्रस्त वाहनाची ओळख पटू नये यासाठी वाहनावरील वाहन क्रमांक पुसण्यात आला आहे. त्यामुळे क्रमांकाच्या पट्टीवर केवळ एमएच-एबी असे लिहून होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता, बोलेरो पीकअप वाहनाचा मॉडेल क्रमांक एफबी-२-डब्ल्यूडीबीएस व चेसेस क्रमांक झेडएन-२-जीएचकेई-१-डीजी-१४७६ आहे. सदर वाहन कोरची येथील दारूविक्रेता निर्मल अंकालू धमगाये हा वापरत होता. दारूसुद्धा त्याचीच आहे. घटनेच्या वेळी वाहन बोलू ऊर्फ महेश प्रकाश मुगनकार रा. मालेवाडा हा चालवित होता, असे पोलिसांनी पंचनाम्यात म्हटले आहे.
घटनास्थळापासून ५०० फूट अंतरावरील नाल्यात ४९० सिलबंद निपा आढळून आल्या. दारू व क्षतिग्रस्त वाहन पोलिसांनी जप्त केले. या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मच्छीरके करीत आहेत.

Web Title: The four-wheelchair transport vehicle turned down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.