३९ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:47+5:302021-08-13T04:41:47+5:30
आलापल्ली येथील करण किराणा स्टोअर्समध्ये चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे अहेरी ...
आलापल्ली येथील करण किराणा स्टोअर्समध्ये चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे अहेरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या सदर दुकानात धाड टाकली. तपासणी केली असता मजा कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे ४० डबे असलेला एक बॉक्स व खुले ९ डबे, असे एकूण ३९ हजार २०० रुपयांचे ४९ डबे पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी व्यावसायिकाविराेधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बोलावून जप्त मालाचे नमुने देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पाेलीस उपनिरीक्षक सुधीर पाडोळे, पोलीस कर्मचारी किशोर बांबोळे, दुर्गशिंग घाटघुमर, प्रशांत हेडाऊ, धर्मेंद्र मेश्राम यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण उपस्थित होते.
बाॅक्स
दोडके येथे ६० किलो गूळ-मोह सडवा नष्ट
कोरची तालुक्यातील दोडके येथील एका दारू विक्रेत्याच्या घरातील जवळपास ६० किलो गूळ-मोहफुलाचा सडवा मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरीत्या शनिवारी नष्ट केला. दाेडके येथून परिसरातील विक्रेत्यांनासुद्धा दारूचा पुरवठा केला जात होता. याबाबतची माहिती प्राप्त होताच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत विक्रेत्याच्या घराची पाहणी केली. दरम्यान, दारू गाळण्यासाठी टाकलेला जवळपास ६० किलो गुळामोहाचा सडवा आढळून आला. संपूर्ण माल नष्ट करीत पुन्हा गावात अवैध दारूची विक्री न करण्याची तंबी देण्यात आली.