पदवी प्रमाणपत्र व मार्कशीटवरील चुका विनामूल्य दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:46+5:302021-03-08T04:33:46+5:30
गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र व मार्कशीटमध्ये विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चुका आहेत प्रशासनाने या चुका ...
गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र व मार्कशीटमध्ये विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चुका आहेत प्रशासनाने या चुका विनामूल्य दुरुस्त कराव्या, अशी मागणी एनएसयुआय जिल्हा गडचिराेलीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला निवेदन देण्यात आले.
वैभव कडस्कर यांनी निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पदवी प्रमाणपत्र व मार्कशीट दुरुस्तीला विद्यार्थ्याकडून पैसे वसूल करणे हे चूकीचे आहे. विद्यापीठाला पैसे घ्यायचे आहे तर ज्या कर्मचाऱ्यांकडून चुका झालेल्या त्यांच्याकडून पैसे घ्यावेत. त्यात विद्यार्थ्यांची चूक नाही. विद्यार्थी हे पैसे भरू शकणार नाही. विनाकारण विद्यार्थ्यांना त्रास देणे विद्यापीठ प्रशासनाने थांबवावे, अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना जिल्हा एनएसयुआयचे सचिव गौरव येंनप्रेडिवर, जिल्हा मीडिया प्रमुख अधिर गेडाम, कुणाल वाढणकर, डेविड हुलके, निखिल जांभूळकर आदी उपस्थित होते.