४० व्यसनी रुग्णांवर माेफत औषधाेपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:34 AM2020-12-31T04:34:00+5:302020-12-31T04:34:00+5:30

आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकाच्या मागे शिक्षक कॉलनीतील मुक्तिपथ तालुका कार्यालयात उपचार क्लिनिक घेण्यात आले.. दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १८ ...

Free drug treatment for 40 addicted patients | ४० व्यसनी रुग्णांवर माेफत औषधाेपचार

४० व्यसनी रुग्णांवर माेफत औषधाेपचार

Next

आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकाच्या मागे शिक्षक कॉलनीतील मुक्तिपथ तालुका कार्यालयात उपचार क्लिनिक घेण्यात आले.. दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १८ रुग्णांनी क्लिनिकला भेट दिली. गडचिरोली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १० रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. दोन्ही तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण २८ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला.

एटापल्ली तालुक्यातील हनपायली येथे ग्रामसभेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिरा घेण्यात आले. दारू सोडण्याची इच्छा असलेल्या १२ रुग्णांनी शिबिराला भेट देत पूर्ण उपचार घेतला. याप्रसंगी साईनाथ मोहुर्ले यांनी उपचाराला आलेल्या रुग्णाला समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदी बाबत रुग्णांना मार्गदर्शन केले. संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेतली. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव पाटील डोलू कोला, ग्रामसभा अध्यक्ष बाजू कोला, भूमय्या घिसू हिचामी, आशा वर्कर सविता हिचामी व गाव संघटना सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Free drug treatment for 40 addicted patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.