कंत्राटदार-अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच राष्ट्रीय महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:44 AM2021-09-17T04:44:00+5:302021-09-17T04:44:00+5:30
या पुलाचे खोदकाम करण्याआधीच संबंधित कंत्राटदाराने मजबूत असा वळण रस्ता तयार करणे गरजेचे होते. पण तसे न केल्यामुळे तो ...
या पुलाचे खोदकाम करण्याआधीच संबंधित कंत्राटदाराने मजबूत असा वळण रस्ता तयार करणे गरजेचे होते. पण तसे न केल्यामुळे तो रस्ता वारंवार पाण्याखाली जात आहे. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कंत्राटदाराच्या त्या कामाकडे डोळेझाकपणा करीत असल्यामुळेच प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप खुणे यांनी केला आहे.
(बॉक्स)
अर्ध्या जिल्ह्याच्या वाहतुकीला फटका
गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा या तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सतत जावे लागते. याशिवाय त्या भागातील नागरिकांनी रुग्णालयासह इतर कामांसाठी गडचिरोलीत यावे लागते. अशा स्थितीत वारंवार वाहतूक ठप्प होत असल्यामुळे जिल्ह्याच्या अर्ध्या भागातील नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करा, अशी मागणी प्रणय खुणे यांनी केली आहे.