हातमोड्या गणपतीपासून ते गुप्त गणपती वैरागडात होते अष्टविनायकांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:41 IST2024-09-07T17:40:28+5:302024-09-07T17:41:07+5:30
पुरातन मूर्ती झाल्या दुर्लक्षित : विशाल दगडावरील महागणपती वेधतोय लक्ष

From Hatmodya Ganapati to Gupta Ganapati in Vairagarh, Ashtavinayakas had their darshan
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : महाराष्ट्रात अष्टविनायकाच्या दर्शनाचे जे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे गावाच्या सीमेलगत भागात व गावात श्री अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत. विशाल दगडावर कोरलेला महागणपती आणि भंडारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी उजव्या सोंडेचा गणपती आहे. काही गणेशमूर्ती काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.
आरमोरीमार्गे वैरागडला जाताना वैरागडपासून दोन किमी अंतरावर उंच भाग आहे. त्याठिकाणी हातमोड्या म्हणजे हात खंडित झालेल्या गणेशाची मूर्ती आहे. दुसरी गणपतीची मूर्ती बोधनकर यांच्या घराजवळील बालाजी खांब येथे आहे. त्या खांबाला टेकून ही गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या हाती परशू (शस्त्र) असून, ती चतुर्भुज आहे. तिसरी गणेश मूर्ती गांधी चौकात वडाच्या झाडाखाली असून, चौथी स्व दिलीप मेहता यांच्या घरासमोर आहे. सध्या त्याठिकाणी पठाण यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. त्याठिकाणी ही गणेशमूर्ती आहे.
पाचवी गणेशमूर्ती गुरुदेव बोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावाच्या पाळीवर विराजमान आहे. अनेक भाविक याठिकाणी गणेश चतुर्थी, अष्टमीला दर्शनाला येतात. सहावी मूर्ती गोरजाई डोहाच्या पात्रात होती. ही मूर्ती आठवडी बाजाराच्या बाजूला जी नवीन वस्ती तयार झाली त्याठिकाणी काही भाविकांनी स्थापित केली आहे. सातवी गणेशमूर्ती वैलोचना नदीच्या काठावर पूर्वी डोंगे घाट होता त्याठिकाणी होती. त्याला गुप्त गणपती म्हणतात. आठवी सिद्धिविनायकाची मूर्ती भंडारेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजावर विराजित आहे. त्याला विजय गणेश म्हणून ओळखले जाते. असे अष्टविनायकाचे दर्शन वैरागडातही होते. याठिकाणी राज्य करणारे लोक या अष्टविनायकांचे दर्शन घेऊनच शुभ कार्याला प्रारंभ करीत होते.
वैरागड येथील गाठे मोहल्ल्यातील देवळात विशाल दगडावर महागणपतीची मूर्ती कोरली आहे. ती मूर्ती भास्कर कोंडेकर यांच्या वाड्यामध्ये मातीमध्ये बुजली होती. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तीचे उत्खनन करून ती मूर्ती सध्या देवळाच्या दर्शनी भागात प्रतिष्ठापित केली आहे. खोदकाम करताना मूर्तीचा एक हात व डोक्यावरचा मुकुट जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नवीन संस्कृती यांचा आनंद घेण्याची इच्छा असेल. Germany Yojana उघडा > तुटलेल्या अवस्थेत आहे.
वैरागड येथे असलेल्या गणेशाच्या मूर्ती त्या काळातील संपन्नतेची पावती आहे. त्यांचे जतन करणे हे पुरातत्व विभागाचे कर्तव्य आहे. मात्र पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सोसत असल्याने या मूर्त्यांची दुरवस्था झाली आहे.
उजव्या सोंडेचा गणपती विदर्भातील अष्टधामांपैकी
उजव्या सोंडेचा गणपती विदर्भातील अष्टधामांपैकी एक आहे. भंडारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी उजव्या सोंडेचा गणपती आहे. उजव्या सोंडेचा गणपती सिद्धिविनायक समजला जातो. अशा गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते. या स्वरूपाच्या मूर्ती दुर्मिळ असतात. ही मूर्ती पराक्रमी असली तरी कोपिष्ट नाही, अशी सर्वत्र मान्यता आहे.