वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत आरमोरी नगर परिषदेला निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:38 AM2021-08-23T04:38:57+5:302021-08-23T04:38:57+5:30

निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी नगर परिषद ही नवनिर्मित आहे. येथील प्रशासकीय इमारत ही खूप जुनी असून, ग्रामपंचायत काळातीलच ...

Fund the Armory Municipal Council under the Special Fund | वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत आरमोरी नगर परिषदेला निधी द्या

वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत आरमोरी नगर परिषदेला निधी द्या

Next

निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी नगर परिषद ही नवनिर्मित आहे. येथील प्रशासकीय इमारत ही खूप जुनी असून, ग्रामपंचायत काळातीलच आहे. सध्या नगर परिषदेच्या कामाचा व्याप खूप वाढला असल्याने या इमारतीमध्ये विविध कार्यालयांसाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, काम करण्यासाठी अडथळा येत आहे. त्यामुळे नगर परिषदेची प्रशासकीय इमारत बांधणे गरजेचे आहे, तसेच आरमोरी येथे रामसागर हा वैशिष्ट्यपूर्ण तलाव आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येईल. आरमोरी शहर हे ५० वर्षांपासून नाट्यनगरी म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या आरमोरी शहरात एकाही ठिकाणी आतापर्यंत एकही नाट्यगृह नाही. त्यामुळे या ठिकाणी नाट्यगृह बांधकामांसाठी निधी उपलब्ध करावा, तसेच पंचायत समितीजवळील खुल्या जागेत व्यायामशाळेची निर्मिती करावी, अशी मागणी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Fund the Armory Municipal Council under the Special Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.