नवोदय विद्यालयासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:20+5:30

१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली.

Fund for Navodaya School | नवोदय विद्यालयासाठी निधी द्या

नवोदय विद्यालयासाठी निधी द्या

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांसोबत खासदार अशोक नेते यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट येथील नवोदय विद्यालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मनुष्यबळ विकासमंत्री तथा नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश पोखरियाल यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. ३५ एकर जमीन नवोदय विद्यालयासाठी आरक्षित आहे. मात्र संरक्षण भिंत नसल्याने पाळीव व जंगली जनावरांचा वावर नवोदय विद्यालयाच्या परिसरात राहतो. विशेष म्हणजे, घोट परिसरात जंगल आहे. जंगलातील हिंस्त्र श्वापद विद्यालयाच्या परिसरात येण्याची शक्यता राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण राहते. शिक्षकांची पदे सुध्दा रिक्त आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पोखरियाल यांनी दिले.

पाणी पिण्याअयोग्य
जवाहर नवोदय विद्यालयाच्या भूगर्भातील पाण्यात आर्सेनिक व फ्लोराईड असल्याचे आढळून आले आहे. नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता, सदर पाणी आरोग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तरीही विद्यार्थी सदर पाणी पित आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. फ्लोराईडयुक्त पाण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे या ठिकाणचे पाणी शुध्द करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासन या विद्यालयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांकडून होत असल्याची बाब खासदारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.
 

Web Title: Fund for Navodaya School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.