बोगस व्हीआर क्रमांक दाखवून निधी लाटला
By Admin | Published: January 1, 2017 01:33 AM2017-01-01T01:33:51+5:302017-01-01T01:33:51+5:30
३०-५४ कामामध्ये बोगस व्हीआर क्रमांक दाखवून कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
निवेदन : स्वप्नील वरघंटे यांचा आरोप
गडचिरोली : ३०-५४ कामामध्ये बोगस व्हीआर क्रमांक दाखवून कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील वरघंटे यांनी खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
३०-५४ कामाच्या अनुदानातून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर अनुदान लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बोगस व्हीआर क्रमांक दाखविला आहे. ज्या रस्त्याला व्हीआर नंबर नाही. त्या रस्त्यालाही चुकीचा व्हीआर नंबर दाखवून शासनाचा निधी लाटण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, त्याचबरोबर सदर निधी संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही वरघंटे यांनी केली आहे. सदर निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनाही पाठविले आहे.