शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:30+5:302021-08-18T04:43:30+5:30

आविसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉम्प्लेक्स बांधकाम करून येथील सुशिक्षित तरुणांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. विभागप्रमुखांची आढावा सभा ...

Funding will be provided for the construction of the shopping complex | शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार

शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार

Next

आविसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉम्प्लेक्स बांधकाम करून येथील सुशिक्षित तरुणांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. विभागप्रमुखांची आढावा सभा आटोपल्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे याबाबतची मागणी आली. त्यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समितीला लागूनच असलेले दोन जुने कोंडवाडे, पडीक गुदामाची तसेच बँक ऑफ इंडियासमोरील पडीक बचत भवन या दोन्ही ठिकाणच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रभारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पडीक गुदाम, बचत भवनासह कोंडवाडे निर्लेखित प्रस्तावासह दोन्ही ठिकाणी तब्बल २०० गाळे बांधकामासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीच्या मागणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच नगरपंचायतला पंचायत समितीच्या मालकीची जागाही देऊ नये, असे सांगितले. तसेच पंचायत समितीच्या जागेवर असलेले सर्व अतिक्रमण काढावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

सिरोंचा पंचायत समितीच्या मालकीच्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी कंकडालवार यांच्या समवेत प्रभारी संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे, पंचायत व शिक्षण विभागाचे अधिकारी, आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविसचे सल्लागार रवी सल्लम, मारोती गणापूरपू, श्याम बेज्जनीवार, साई मंदा, उपसरपंच अशोक हरी, तिरुपती चिट्याला, किरण वेमुला, सरपंच सूरज गावडे, सरपंच लक्ष्मण गावडे, लक्ष्मण बोल्ले, रवी बांगोनी आदी उपस्थित होते.

Web Title: Funding will be provided for the construction of the shopping complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.