नगर पंचायतची शवयात्रा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:55+5:302021-07-29T04:35:55+5:30
अहेरी ही राजनगरी म्हणून प्रसिद्ध आहे व जिल्ह्याची मागणी पण मागील कित्येक वर्षांपासून होत आहे. पण राजनगरीत बस स्टॉप ...
अहेरी ही राजनगरी म्हणून प्रसिद्ध आहे व जिल्ह्याची मागणी पण मागील कित्येक वर्षांपासून होत आहे. पण राजनगरीत बस स्टॉप रोड, तहसील कार्यालय रोड, छोटा बस स्टॉप, बाजारवाडी, गांधी चौक, आझाद चौक, दानशूर चौक, धरमपूर रोड येेथे माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. लोकांचे चालणे कठीण झाले आहे. वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या गंभीर विषयाची महिती नगर पंचायतला दिल्यावर सुध्दा १० दिवसांच्या अवधी होऊन गेले असले तरीही नगर पंचायतकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. आठ दिवसांच्या आत खड्डे न बुजवल्यास नगर पंचायतला जाग आण्यासाठी आविस पक्षातर्फे नगर पंचायतीची प्रतीकात्मक शवयात्रा काढून त्यांचा निषेध करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे शहराध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, मिलिंद अलोने, विलास गळबले, साईनाथ ओतकर उपस्थित हाेेते.