गडचिराेली- चामाेर्शी व साेमनपल्लीकडील मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:36 AM2021-09-13T04:36:02+5:302021-09-13T04:36:02+5:30
जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या समाेर सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. आलापल्ली-सिरोंचा ...
जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या समाेर सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे.
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरून वाहतूक सुरू आहे. वैनगंगा नदीच्या पाण्यामुळे गोविंदपूर नजीकच्या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने चामोर्शी- गडचिरोली मार्ग बंद आहे. त्यामुळे पोटेगावमार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २१ गेट ०.५० मीटरने उघडलेले असून २५१६ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उघडलेले असून ७०१९ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीची पाणी पातळी पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. वर्धा नदीवरील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी २१ गेट उघडलेले असून ५८२ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बामणी व सिरपूर / सकपूर सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. प्राणहिता नदीची पाणी पातळी महागाव व टेकरा सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.