स्वाध्याय उपक्रमात गडचिराेली जिल्हा राज्यात ‘टाॅप-१०’ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:59+5:302020-12-30T04:44:59+5:30
विद्यार्थ्यांनी स्वत:च मूल्यांकन करावे, यासाठी स्वाध्यायाच्या माध्यमातून त्यांचा सराव करण्यात येत आहे. हा उपक्रम व्हाॅट्सॲप बेस उपक्रम आहे. पहिली ...
विद्यार्थ्यांनी स्वत:च मूल्यांकन करावे, यासाठी स्वाध्यायाच्या माध्यमातून त्यांचा सराव करण्यात येत आहे. हा उपक्रम व्हाॅट्सॲप बेस उपक्रम आहे. पहिली ते दहावी या वर्गांसाठी या उपक्रमाची सुरूवात ३ नाेव्हेंबर राेजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी भाषा व गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न साेडविल्यांनतर लगेच उत्तरपत्रिका उपलब्ध हाेते. त्यातून काेणते प्रश्न चुकले व काेणते बराेबर आहेत याची माहिती मिळते. आतापर्यंत सहा स्वाध्याय झाले आहेत. एकाच माेबाईलवर अनेक विद्यार्थी स्वाध्याय साेडवू शकतात. या उपक्रमाला नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वाधिक नाेंदणी चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. ७८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हानिहाय संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. गडचिराेलीचे संपर्क अधिकारी म्हणून डाॅ. सीमा पुसदकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बाॅक्स
नेटक्नेक्टीव्हीची समस्या असतानाही चांगला प्रतिसाद
गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे लाेकसंख्या विरळ आहे. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत.काही तालुक्यांमध्ये केवळ तालुकास्तरावरच माेबाईल टाॅवर आहेत. त्यांचीही क्षमता कमी आहे. अनेक गावांमध्ये अजूनही टूजी टाॅवर आहेत. या टाॅवरमुळे नेट कनेक्टीव्हीटी राहत नाही. अशाही स्थितीत स्वाध्याय उपक्रमासाठी गडचिराेली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शिक्षकांसाेबतच, गडचिराेली डायट व जिल्हासंपर्क अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.