पूर्व विदर्भात गडचिराेलीचा पाॅझिटिव्हिटी रेट सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:17+5:302021-05-19T04:38:17+5:30
दिनांक १८ मे राेजी गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ७६८ काेराेना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २५४ रुग्ण काेराेनाबाधित आढळून ...
दिनांक १८ मे राेजी गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ७६८ काेराेना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २५४ रुग्ण काेराेनाबाधित आढळून आले आहेत. केलेल्या तपासण्या व आढळेले पाॅझिटिव्ह रुग्ण लक्षात घेतले, तर पाॅझिटिव्हिटी रेट १३.२ टक्के आढळून आला आहे. विशेष म्हणजे पूर्व विदर्भातील नागपूरचा पाॅझिटिव्हिटी रेट ६.९ टक्के, भंडारा ६.९ टक्के, चंद्रपूर ११.८ टक्के, गाेंदिया ८ टक्के, वर्धा १२.६ टक्के एवढा आढळून आला आहे. गडचिराेली जिल्ह्याचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा सरासरी पाॅझिटिव्हिटी रेट १०.८७ टक्के एवढा आहे. जाे पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५० हजार ६७ तपासण्या करण्यात आल्या आहेत.
बाॅक्स
४१६ जणांनी केली काेराेनावर मात
जिल्ह्यात २५६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ४१६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज ८ नवीन मृत्यूमध्ये ६५ वर्षीय पुरुष एटापल्ली, ५८ वर्षीय महिला नेताजीनगर गडचिरोली, ७० वर्षीय पुरुष गोठणगाव, ता. कुरखेडा, ७० वर्षीय पुरुष वासी ता. कुरखेडा, ४९ वर्षीय पुरुष सोनेगाव ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ८२ वर्षीय पुरुष अहेरी, ७० वर्षीय पुरुष राजाराम, ता. अहेरी, ७० वर्षीय पुरुष एमआयडीसीरोड गडचिरोली यांचा समावेश आहे.
नवीन २५६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६२ अहेरी तालुक्यातील २२, आरमोरी १३, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ६५, धानोरा तालुक्यातील १३, एटापल्ली तालुक्यातील ६, कोरची तालुक्यातील ५, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ९, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये २८, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये १६, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये १३ जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या ४१६ रुग्णांमध्ये गडचिरोली मधील १३०, अहेरी ३५, आरमोरी २३, भामरागड ७, चामोर्शी ४०, धानोरा २८, एटापल्ली २५, मुलचेरा २९, सिरोंचा ३४, कोरची ४, कुरखेडा २७ तसेच देसाईगंज तालुक्यातील येथील ३४ जणांचा समावेश आहे.