गडचिराेलीची बाजारपेठ आज राहणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:26+5:302021-08-22T04:39:26+5:30
गडचिराेली : राखी पाैर्णिमेनिमित्त गडचिराेली शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठ राखी तसेच विविध साहित्यांनी सजली आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट राेजी रविवारला ...
गडचिराेली : राखी पाैर्णिमेनिमित्त गडचिराेली शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठ राखी तसेच विविध साहित्यांनी सजली आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट राेजी रविवारला रक्षाबंधन असल्याने गडचिराेली शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे, अशी माहिती येथील व्यापारी असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गडचिराेली शहरातील बाजारपेठेवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्बंध लावण्यात आले हाेते. जसजसा काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत गेला, तसतसे बाजारपेठेवरील निर्बंध उठविण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश काढून येथील व्यापारी व ग्राहकांना दिलासा देण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून दर शनिवारला दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत आहेत. तसेच रविवारला बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवल्या जात आहे. मात्र आता २२ ऑगस्ट राेजी रविवारला रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशी माहिती व्यापारी असाेसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.