गडचिराेली तालुक्यात काेराेनाचे सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:39+5:302021-02-08T04:32:39+5:30
गडचिराेली : जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमधील काेराेना मृतकांची संख्या विचार लक्षात घेतली, तर गडचिराेली तालुक्यातील सर्वाधिक ४१ काेराेना रुग्णांचा मृत्यू ...
गडचिराेली : जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमधील काेराेना मृतकांची संख्या विचार लक्षात घेतली, तर गडचिराेली तालुक्यातील सर्वाधिक ४१ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरमाेरी व चामाेर्शी तालुक्यातील प्रत्येकी १५ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाचा प्रभाव लक्षात यावा, या उद्देशाने आराेग्य विभागामार्फत काेराेना रुग्णांची संख्या तसेच काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येचे विश्लेषण केले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तालुकानिहाय रुग्ण, वयनिहाय रुग्ण व काेणत्या महिन्यामध्ये किती रुग्ण आढळले, आदी आकडेवारीचा समावेश आहे. गडचिराेली तालुक्यातील गडचिराेली हे सर्वाधिक माेठे शहर आहे. तसेच गडचिराेली शहरातील अनेक नागरिक देशविदेशांत जात असल्याने गडचिराेली शहरातील सर्वाधिक नागरिकांना काेराेनाची लागण झाली. तसेच काही वयाेवृद्ध व इतर आजारांनी ग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच गडचिराेली तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक काेराेनाचे रुग्ण व मृत्यू झाले आहेत.
बाॅक्स
बरे हाेण्याचे प्रमाण ९८.३६ टक्के
आराेग्य विभागाकडून प्राप्त ६ जुलैच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ३८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १०५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये काेराेना रुग्णांचे बरे हाेण्याचे प्रमाण ९८ ते ९९ टक्क्यांच्या दरम्यान आहे. गडचिराेली तालुक्यात सर्वाधिक २५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर एटापल्ली व देसाईगंज हे तालुके काेराेनामुक्त झाले आहेत.
५१ ते ७० वयाेगटाच्या रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू
आजपर्यंतच्या १०५ काेराेना रुग्णांच्या मृत्यूमध्ये ६१ ते ७० या वयाेगटातील रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. ५१ ते ६० वयाेगटांतील २३ रुग्ण, तर ६१ ते ७० या वयाेगटातील २९ रुग्ण काेराेनामुळे मृत्यू झाले आहेत.
तालुकानिहाय मृत्यू
अहेरी १०
आरमाेरी १५
भामरागड ०
चामाेर्शी १५
धानाेरा ४
एटापल्ली १
गडचिराेली ४१
कुरखेडा ५
काेरची १
मुलचेरा ०
सिराेंचा ४
देसाईगंज ९
एकूण १०५
वयाेगटानुसार मृत्यू
० ते २० - ०
२१ ते ३० - ६
३१ ते ४० - ११
४१ ते ५० - १८
५१ते ६० - २३
६१ ते ७० - २९
७१ ते ८० - १५
८१ ते ९० - ३
महिनानिहाय मृत्यू
सप्टेंबर २४
ऑक्टाेबर ३८
नाेव्हेंबर २३
डिसेंबर १८
जानेवारी २
फेब्रुवारी ०
एकूण रुग्ण
९३८७
काेराेनामुक्त झालेले
९२३३
एकूण मृत्यू
१०५