गडचिराेलीत माेकाट जनावरांचे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:28+5:302021-08-29T04:35:28+5:30
२५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील कॉम्प्लेक्स येथील शासकीय रुग्णालयासमोर एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली. ...
२५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील कॉम्प्लेक्स येथील शासकीय रुग्णालयासमोर एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली. यामध्ये वासरू जखमी झाला. ही बाब काही नागरिकांनी पीपल फॉर एन्हायर्नमेंट ॲण्ड ॲनिमल वेलफेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांना दिली. कुकडकर व कार्यकर्ते घटनास्थळी पोहाेचले; परंतु रात्रीच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे खासगी वाहनाद्वारे वासराला नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन डेपोकडे नेण्यात येत होते. दरम्यान, त्याच मार्गावरील आयटीआय चौकात आणखी एक बैल अपघातात जखमी होऊन पडल्याचे निदर्शनास आले. त्या बैलालासुध्दा वाहनात टाकून कचरा व्यवस्थापन डेपोमध्ये नेण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरामे यांना बोलाविण्यात आले. दोन्ही जखमी जनावरांवर उपचार करण्यात आला. परंतु वासरू गंभीर जखमी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर बैलाचे प्राण वाचविण्यात यश आले.
यावेळी गिरीश कोहपरे, चेतन शेंडे, दीपक राठी, सौरभ सातपुते, अमित तिवाडे, नयन कहाले, मुरारी तिवारी आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी मोकाट जनावरांना सोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु पशुपालकांकडून जनावरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे जनावरांना आपले प्राण गमवावे लागत आहे.
280821\28gad_3_28082021_30.jpg
जखमी बैलावर उपचार करताना पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य.