गडचिरोलीत १४ कोरोनामुक्त तर नवीन ३५ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 08:59 PM2020-09-11T20:59:17+5:302020-09-11T20:59:36+5:30
35 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे 24 जण बाधित आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सक्रिय कोरोना बाधितांपैकी शुक्रवारी जिल्हयात 14 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 4, वडसा 1, कुरखेडा 1, चामोर्शी येथील 1, आरमोरी 1, एटापल्ली 6 असे एकूण 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर 35 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे 24 जण बाधित आढळून आले. यामध्ये एक सीआरपीएफ, दोन चंद्रपूरचे आहेत. आरमोरी येथील 1 प्रवासी, सिरोंचा 2, कुरखेडा 5, वडसा 3 यामध्ये एक एसआरपीएफचा समावेश आहे असे आज एकुण 35 नवीन कोरोना बाधित आढळले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 325 झाली असून एकुण बाधित संख्या 1503 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 1176 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
कुरखेडा येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळेच
कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याची एन्टीजन कोरोना तपासणी सकारात्मक आली होती. याबाबत आरोग्य विभागाने त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट केले. यामुळे जिल्हयातील पहिल्या कोरोना रूग्णाच्या मृत्युची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हयाबाहेर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्हयात एकूण दोन मृत्यू झाल्याच्या नोंदी आता पोर्टलवर करण्यात आल्या आहेत.