गडचिरोलीत २४ तासात ७७ जण कोरानामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 09:50 PM2020-09-21T21:50:02+5:302020-09-21T21:52:52+5:30
क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत रविवारी ३३ रुग्णांची भर पडली. पण याचवेळी ७७ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे क्रियाशिल रुग्णांचा आकडा पुन्हा कमी ४९३ वर आला आहे. पुढील आठवड्यात जनता कर्फ्यूदरम्यान पुन्हा रुग्णसंख्या घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे. याशिवाय सिरोंचा १२, चामोर्शी ११, कुरखेडा ५, अहेरी १, आरमोरी १, धानोरा ११, कोरची १, मुलचेरा २ व वडसा ६ जणांचा समावेश आहे. नवीन ३३ बाधितांमध्ये गडचिरोली १८, चामोर्शी ४, मुलचेरा १, अहेरी २, आरमोरी १, धानोरा ३, वडसा १, सिरोंचा १, कोरची १ व भामरागड येथील एका जणाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९३ झाली. आतापर्यंत एकूण बाधित १ हजार ९५७ रूग्णांपैकी १ हजार ४५४ जणांनी कोरोनावर मात केली.
लांब पल्ल्याच्या बसेस राहतील बंद
हा जनता कर्फ्यू गडचिरोली शहरापुरता असल्यामुळे जिल्हाभरातील व्यवहार सुरू राहतील. त्यासोबतच एसटीच्या बसफेऱ्याही सुरू राहतील. मात्र काही नियोजित लांब पल्ल्याच्या बसफेºया रद्द केल्या जाऊ शकतात असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जनता कर्फ्यूला हॉटेल असोसिएशनचा पाठिंबा
बुधवार ते बुधवार असा आठवडाभर गडचिरोली शहरात पाळल्या जाणाºया जनता कर्फ्यूला शहरातील हॉटेल असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता आठ दिवस हॉटेल, रेस्टॉरेंट, स्वीट मार्ट, उपहार गृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, असे असोसिएशनच्या वतीने चंद्रकांत पतरंगे आणि रोशन कवाडकर यांनी कळविले.