अंगणात झाेपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटविले, नक्षलग्रस्त छल्लेवाडातील थरार, मृत्यूशी झुंज सुरू

By संजय तिपाले | Published: June 2, 2024 02:53 PM2024-06-02T14:53:05+5:302024-06-02T14:53:29+5:30

Gadchiroli News: घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या येथे उघडकीस आली.

Gadchiroli: A person who was sleeping in the yard was set on fire by pouring petrol, the thrill in Naxal-hit Chhallewada, the fight to the death continues | अंगणात झाेपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटविले, नक्षलग्रस्त छल्लेवाडातील थरार, मृत्यूशी झुंज सुरू

अंगणात झाेपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटविले, नक्षलग्रस्त छल्लेवाडातील थरार, मृत्यूशी झुंज सुरू

- संजय तिपाले  
गडचिरोली - घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या येथे उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (४८) असे  जखमीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत. या क्रूर हल्ल्यामागील नेमके कारण अस्पष्ट आहे.

चरणदास चांदेकर हे उकाड्यामुळे अंगणात खाटेवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व काडीपेटीने आग लावली. यानंतर तो पळून गेला. इकडे आगीच्या ज्वालांमध्ये चरणदास यांचे शरीर भाजले गेले. 

त्यांनी आरडाओरड केल्यावर कुटुंबातील इतर सदस्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे.   त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी रेपनपल्ली  ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांकडे चौकशी सुरु
चरणदास यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांकडे पोलिसांनी तपास सुुर केला आहे. मात्र, चरणदास यांचा गावात कोणाशी वाद नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. तपास सुरु असल्याचे रेपनपल्ली पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Gadchiroli: A person who was sleeping in the yard was set on fire by pouring petrol, the thrill in Naxal-hit Chhallewada, the fight to the death continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.