गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:01 PM2024-11-24T16:01:19+5:302024-11-24T16:02:14+5:30

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : जिल्ह्यातील तिनही मतदार संघांना लाभलेले शिलेदार

Gadchiroli, Aheri and Armori constituencies have received MLAs till date | गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोलीअहेरी या तीनही मतदार संघातील मतदारांनी आलटून-पालटून विजयाची माळ वेगवेगळ्या उमेदवारांच्या गळ्यात घातली. 


सन १९६२ ते २०२४ या कालावधीतील तीनही मतदार संघाचा आजपर्यंतचा आढावा बघितल्यास येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना आदी पक्षांच्या उमेदवारांना विधानसभेत पोहोचण्याची संधी मिळाली. याशिवाय नाविस, गोंगपा या लहान पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनीही विधानसभेचे प्रतिनिधीत्त्व केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे. या तीनही मतदार संघात आजपर्यंत महिलांना आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करता आले नाही. सन २०१४ व २०१९ तसेच आता २०२४ मध्ये जिल्ह्यातील मतदारांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या झोळीत भरभरून मतदान केल्याचे दिसून येते. या तीन पक्षाच्या उमेदवारांना आमदार होता आले. 


सन २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात गडचिरोली व आरमोरी या मतदार संघात काँग्रेसने विजय मिळविला. तर अहेरीमध्ये अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर राजकारणाचे जिल्ह्यातही संदर्भ बदलले. विशेष म्हणजे, गडचिरोली व आरमोरी मतदार संघात आजवर अनेक महिला उमेदवारी घेत रिंगणात उतरल्या होत्या. मात्र एकाही महिला उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.


अहेरी विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४
१९६२ - राजे विश्वेश्वरराव आत्राम (अपक्ष) 
१९६७ - जे. वाय. साखरे (अपक्ष) 
१९७२ - मुकूंदराव अलोने (काँग्रेस) 
१९७७ - भगवानशहा मेश्राम (अपक्ष)
१९८० - पेंटारामा तलांडी (बिनविरोध, काँग्रेस)
१९८५ - सत्यवानराव आत्राम (नाविस)
१९९० - धर्मरावबाबा आत्राम (काँग्रेस)
१९९५ - सत्यवानराव आत्राम (नाविस) 
१९९९ - धर्मरावबाबा आत्राम (गोंगपा) 
२००४ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
२००९ - दीपक आत्राम (अपक्ष) 
२०१४- अम्ब्रीशराव आत्राम (भाजप) 
२०१९ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
२०२४ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)


आरमोरी विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४
१९६२ जगन्नाथ पा. म्हशाखेत्री (भाराकाँ)
१९६७ - डी.व्ही. नारनवरे (भाराकाँ)
१९७२ - बाबुराव मडावी (भाराकाँ) 
१९७७ - दिनाजी नारनवरे (अपक्ष) 
१९८० - बाबुराव मडावी (भाराकाँ) 
१९८५ - सुखदेवबाबू उईके (भाराकाँ) 
१९९० - हरीराम वरखडे (शिवसेना) 
१९९५ - डॉ. रामकृष्ण मडावी (शिवसेना) 
१९९९ - डॉ. रामकृष्ण मडावी (शिवसेना) 
२००४ - आनंदराव गेडाम (काँग्रेस) 
२००९ - आनंदराव गेडाम (काँग्रेस) 
२०१४ - कृष्णा गजबे (भाजप) 
२०१९ - कृष्णा गजबे (भाजप) 
२०२४ - रामदास मसराम (काँग्रेस)


गडचिरोली विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४
१९६२ - फतेलालशाह सयाम (अपक्ष) 
१९६७ आर. डी. आत्राम (अपक्ष) 
१९७२ - विश्वेश्वराव आत्राम (अपक्ष) 
१९७७ देवाजी मडावी (काँग्रेस आय) 
१९८० मारोतराव कोवासे (काँग्रेस) 
१९८५ - हिरामण वरखडे (जनता पार्टी) 
१९९० - मारोतराव कोवासे (काँग्रेस)
१९९५ - मारोतराव कोवासे (काँग्रेस) 
१९९९ - अशोक नेते (भाजप) 
२००४ - अशोक नेते (भाजप) 
२००९ - डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) 
२०१४ - डॉ. देवराव होळी (भाजप) 
२०१९ - डॉ. देवराव होळी (भाजप) 
२०२४ - डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)

Web Title: Gadchiroli, Aheri and Armori constituencies have received MLAs till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.