गत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:59 AM2018-01-12T11:59:37+5:302018-01-12T12:01:58+5:30

गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले.

Gadchiroli and Gondia districts have blamed the 19 Naxals for the past one year | गत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ जणांचे आत्मसमर्पण६७ समर्थकांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर ६७ नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले. तसेच २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादित राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे २०१७ या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसून नक्षल चळवळीची मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.२०१७ या वर्षात एकूण १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये मात्र ३ पोलिस शहीद झाले. पोलिसांनी ६७ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला.
त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. १८१ गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावकºयांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.

पोलिसांनी नक्षलग्रस्त व दुर्गम भागात जनसंपर्क वाढवून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच ग्रामभेट, जनजागरण मेळावे आदी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून नागरीकांच्या समस्या पोलिसांकडून नियमित सोडविल्या जात असल्यामुळे जनतेचा शासनावर विश्वास वाढला आहे. नक्षली केवळ दिशाभूल करीत असल्याची जाणीव नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना झाली असल्यामुळे त्यांनी शासनाच्या विकासाला होकार व नक्षल्यांना नकार दिला आहे.
-शरद शेलार, पोलिस महानिरीक्षक तथा नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख

Web Title: Gadchiroli and Gondia districts have blamed the 19 Naxals for the past one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.