एसटी कर्मचाऱ्यांचे गडचिरोली व अहेरीत धरणे

By admin | Published: September 29, 2015 03:02 AM2015-09-29T03:02:14+5:302015-09-29T03:02:14+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी

In Gadchiroli and Inheritance of ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचे गडचिरोली व अहेरीत धरणे

एसटी कर्मचाऱ्यांचे गडचिरोली व अहेरीत धरणे

Next

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाविरोधात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आगारासमोर आयोजित धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नीलेश वाढ, सचिव विठ्ठल घोडाम, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम भटकर, कोषाध्यक्ष विलास इंगोले, उपाध्यक्ष जमनदास खोब्रागडे, रसूल पठाण, रमेश जाधव, सुनील बंडीवार, देवराव दुमाने, शेख इस्माईल शेख, पद्माकर जाधव, रत्नपाल चुधरी, सय्यद रहेमान, गोपीचंद चव्हाण, जगन्नाथ इंगळे यांच्यासह ८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ आॅक्टोबर रोजी विभागीयस्तरावरील आंदोलन पुन्हा करण्यात येईल, असा इशारा आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी दिला.
अहेरी येथे संघटनेचे अध्यक्ष एम. पी. बागसरे, सचिव एम. एच. पठाण यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दोन्ही आगारात संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर याचा थेट परिणाम झाला. गडचिरोली आगाराचे १० शेड्युल सोमवारी रद्द करण्यात आले. जिल्ह्यातकलम ३७ लागू करण्यात आले असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी विविध राज्यस्तरीय व स्थानिक मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले. अहेरी आगारात स्थानिक मागण्यांना घेऊन कर्मचारी आक्रमक होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: In Gadchiroli and Inheritance of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.