गडचिरोलीत आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली प्रसूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:23 PM2018-03-29T15:23:39+5:302018-03-29T15:23:51+5:30

अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

In the Gadchiroli Ashramshala, a 10-year-old girl delivered a baby | गडचिरोलीत आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली प्रसूत

गडचिरोलीत आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली प्रसूत

Next
ठळक मुद्देवर्गमित्रासोबत प्रेमप्रकरण मुख्याध्यापकासह तिघे निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले.
विशेष म्हणजे सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली. पण तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना साधा संशयही आला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्या विद्यार्थिनीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे बयाणात म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी.पी.चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या विद्यार्थिनीला वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने त्या मुलीचे बयाण घेतले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.

वैद्यकीय तपासणीच होत नाही !
वास्तविक प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच जात नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.
आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलींची नियमित मासिक पाळी येत असल्याची नोंद दर महिन्याला रजिस्टरमध्ये करावी लागते. या प्रकरणातील पीडित मुलीची मासिक पाळी नियमित येत असल्याचे नोंद आहे. यावरून ती नोंद किती तकलादू असते हे दिसून येत आहे.

Web Title: In the Gadchiroli Ashramshala, a 10-year-old girl delivered a baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.