Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा
By संजय तिपाले | Published: June 4, 2024 04:11 PM2024-06-04T16:11:22+5:302024-06-04T16:14:43+5:30
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान यांना ९० हजारांचे मताधिक्क्य
संजय तिपाले, गडचिरोली
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 :गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना १६ फेऱ्यांअखेर ९० हजार मतांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची मानली जात आहे.
या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्याशी झाला. डॉ. किरसान हे पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. १६ फेऱ्यांचे निकाल आतापर्यंत बाहेर आले. यात सुमारे ९० हजारांहून अधिक मतांसह डॉ. नामदेव किरसान आघाडीवर आहेत. गडचिरोली - चिमूर मतदासंघांत १६ लाख १७ हजार २०७ इतके मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अजून १० फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाजपच्या गोटात मात्र काळजीचे वातावरण आहे.
काँगेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
मतमोजणीच्या ठिकाणी काँग्रेसने निर्णायक मताधिक्क्य घेतले. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी असलेल्या काँगेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. डॉ. किरसान यांना अनेकांनी अलिंगण देत शुभकामना व्यक्त केल्या.