Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम
By संजय तिपाले | Published: June 4, 2024 11:47 AM2024-06-04T11:47:41+5:302024-06-04T11:49:41+5:30
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांनी पुढे
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या निकालानंतर काँग्रेसच पुढे आहे. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांची आघाडी घेतली आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान असा थेट सामना आहे. पहिल्या फेरीपासून डॉ. किरसान यांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेरपर्यंत आघाडी कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. पहिल्या फेरीत डॉ. किरसान यांनी ३८०४ मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत भाजपचे अशोक नेते यांना २० हजार ७५० मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. किरसान यांना २५ हजार ३८५ मते मिळाली. तीन फेऱ्यांअखेर डॉ. किरसान हे ८ हजार २३९ मतांनी आघाडीवर आहेत.
'वंचित' तिसऱ्या क्रमांकावर
या मतदासंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश मडावी यांनी तिसऱ्या फेरीअखेर २ हजार २२६ मते घेतली. मडावी यांनी घेतलेली मते ही तिसऱ्या क्रमांकाची असून बहुजन समाज पार्टीचे योगेश गोन्नाडे चौथ्या क्रमांकावर आहेत.