स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:44+5:30

२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले.

Gadchiroli city ranks third in the state in cleanliness | स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

Next
ठळक मुद्देदेसाईगंज ३१ व्या स्थानावर : सर्व नगर पंचायतींची स्थितीही लाजीरवाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर केला आहे. त्यात गडचिरोली शहराने राज्यातून सर्वात शेवटून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देसाईगंज शहराची स्थिती थोडी चांगली आहे. या शहराने १०७ शहरांपैकी ३१ वा क्रमांक पटकाविला आहे.
शहरी भागात स्वच्छता राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीचा उपयोग करून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवायचे असतात. त्यानंतर बाह्य समितीकडून पाहणी केली जाते. २०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले. यावरून शहरातील स्वच्छतेचा अंदाज येण्यास मदत होते. राज्यातील इतर शहरे स्वच्छतेत देशात आघाडीवर असताना गडचिरोली शहराने शेवटून तिसरे स्थान पटकाविणे ही बाब शहरवासियांसाठी लाजीरवाणी ठरत आहे.
नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यास गडचिरोली नगर परिषद अपयशी ठरली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी स्वच्छतेत गडचिरोली शहर माघारत चालले आहे. गडचिरोली शहराने स्वच्छतेबाबतचे नियोजन करून पुढील वर्षी स्वच्छतेत चांगले स्थान मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
२५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देसाईगंज शहर सहभागी झाले होते. या गटात राज्यातील एकूण १०७ शहरे सहभागी झाली होती. त्यात देसाईगंज नगर परिषदेने ३१ वा क्रमांक पटकाविला आहे. या शहराने पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविले नसले तरी गडचिरोली शहरापेक्षा या शहराची स्थिती थोडी चांगली असल्याचे दिसून येते.

मुलचेराला राज्यातून शेवटचा क्रमांक
२५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद व सर्व नगर पंचायतींचा समावेश होता. या गटात राज्यभरातून १८६ शहरे सहभागी झाली होती. त्यात मुलचेरा नगर पंचायतीला सर्वात शेवटचा १८६ वा क्रमांक मिळाला आहे. सिरोंचा नगर पंचायतीला १८५, अहेरी १८३, एटापल्ली १७६, भामरागड १६८, चामोर्शी १५७, कुरखेडा १२२,धानोरा ११७, आरमोरी ११० तर कोरचीने ४० वा क्रमांक पटकाविला आहे. सर्वच नगर पंचायतींना १०० च्या वरचे स्थान मिळाले आहे. मात्र कोरचीने ४० वे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींनी कोरची नगर पंचायतीकडून स्वच्छतेचे धडे घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील वर्षी किमान ५० मध्ये स्थान पटकाविता येईल.

Web Title: Gadchiroli city ranks third in the state in cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.