भारत बंदामुळे गडचिरोलीतील पूर्णपणे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:45 PM2020-01-08T17:45:44+5:302020-01-08T17:45:48+5:30

कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी ८ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला होता.

Gadchiroli completely shut down due to Bharat Bandh | भारत बंदामुळे गडचिरोलीतील पूर्णपणे कामकाज ठप्प

भारत बंदामुळे गडचिरोलीतील पूर्णपणे कामकाज ठप्प

googlenewsNext

गडचिरोली : कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी ८ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. या संपात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाचे कामकाज बुधवारी पूर्णपणे ठप्प पडले होते.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संघटनांनी ८ जानेवारीला संप करण्याचा इशारा दिला होता. या संपाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनीही पाठींबा दिला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदविला. बहुतांश कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविला.

जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील ९० टक्क्याहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यालयांमधील टेबल, खुर्च्या रिकाम्या होत्या. शासकीय कामकाजासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.

Web Title: Gadchiroli completely shut down due to Bharat Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.