Gadchiroli: पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर

By संजय तिपाले | Published: October 27, 2023 10:44 PM2023-10-27T22:44:03+5:302023-10-27T22:44:23+5:30

Gadchiroli: अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती.

Gadchiroli: Daughter-in-law's friend also involved in murder of five, poison powder ordered online | Gadchiroli: पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर

Gadchiroli: पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर

- संजय तिपाले
गडचिरोली  - अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती. या प्रकरणात सून व पतीची मामी या दोघी सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, सुनेच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने तिला विषारी पावडर उपलब्ध करुनदिल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यास २६ ऑक्टोबरला पोलिसांनी जेरबंद केले. अविनाश ताजणे (रा. खामगाव जि. बुलढाणा ) असे त्याचे नाव आहे. संघमित्रा कुंभारे हिचा तो पूर्वाश्रमीचा मित्र आहे.

२० दिवसांत महागाव येथील शंकर कुंभारे यांच्या कुटुंबातील पाच जणांच्या गूढ मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. शंकर कुंभारे (५२), त्यांची पत्नी विजया (४५), विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) , मावशी आनंदा उर्फ वर्षा उराडे (५०,रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) व मुलगा रोशन कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत.

संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा प्रमोद रामटेके (४२) या दोघींनी मिळून हे हत्याकांड केल्याची खळबळजक माहिती तपासात समोर आली. त्या दोघी अहेरी पोलिसांच्या कोठडीत आहेत. चौकशीत रोजा रामटेके हिने गुन्ह्यासाठी वापरलेले विषारी पावडर शालेय मित्र अविनाश ताजणे याने उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. तो हैद्राबादेत सुरक्षारक्षक म्हणून खासगी कंपनीत काम करतो. त्याने ऑनलाइन विषारी पावडर मागितले व ते संघमित्राला दिले. त्यास २६ रोजी अहेरी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड, पो.नि.मनोज काळबांडे तपास करत आहेत.

दरम्यान, ऑनलाईन खरेदी केलेले पावडरवर बंदी होती की नाही नाही, पैसे रोख दिले की ऑनलाइन, हे गुलदस्त्यात असून चौकशीनंतर सर्व तथ्य समोर येणार आहे.

चार दिवसांची वाढीव कोठडी
दरम्यान, संघमित्रा कुंभारे, रोजा रामटेके यांची दहा दिवसांची कोठडीची मुदत संपल्याने २७ रोजी त्यांना व नव्याने अटक केलेला अविनाश ताजणे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सर्वांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Gadchiroli: Daughter-in-law's friend also involved in murder of five, poison powder ordered online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.