गडचिरोली जिल्ह्यात सहा ठिकाणी धाडी, मोहफुलाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:24 PM2020-05-02T19:24:34+5:302020-05-02T19:25:30+5:30
गडचिरोली जिल्ह्यात गेवर्धा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुरंडी येथील सहा दारू विक्रेत्यांच्या घरी कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६७ हजार रुपयांची मोहफुलाची दारू व सडवा जप्त केला आहे. तसेच सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेवर्धा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुरंडी येथील सहा दारू विक्रेत्यांच्या घरी कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६७ हजार रुपयांची मोहफुलाची दारू व सडवा जप्त केला आहे. तसेच सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुरंडी येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढून विक्री केली जात असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांच्या पथकाने कुरंडी येथील दारू विक्रेत्यांच्या घरी एकाच वेळी धाड टाकली. रमेश रैजू कवडो यांच्या घरून १४ हजार रुपयांची दारू व मोहफुलाचा सडवा तसेच साहित्य जप्त केले. वर्षा सुखदेव गावळे हिच्या घरून ९ हजार ५०० रुपयांची दारू, सिताराम महादेव गावडे व महादेव सिताराम गावडे यांच्याकडून १७ हजार ६०० रुपयांची दारू, दिनेश जीवन नैताम याच्या घरून १० हजार ३०० रुपये, शालिक तुलावी कडून ४ हजार ७०० रुपये तर नरेश रैजू गावडे याच्याकडून ११ हजार २०० रुपयांची दारू असे एकूण ६७ हजार ३०० रुपयांची दारू , मोहफूल सडवा व साहित्य जप्त केले आहेत. सात आरोपींविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू गाळण्याकरिता वापरण्यात येणारी सर्व साहित्य, मोहफूल सडवा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरिक्षक सुधाकर देढे, सहायक पोलीस निरिक्षक समिर केदार, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेडेकर, सहायक पोलीस उपनिरिक्षक अरूण पारधी, नितीन नैताम, केवळराम धांडे यांच्या पथकाने केली.