गडचिरोली जिल्ह्यात पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:48 PM2020-06-06T12:48:35+5:302020-06-06T12:49:02+5:30

खरीप पिकांचा हंगाम जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे.

In Gadchiroli district, pre-sowing farming has gained momentum | गडचिरोली जिल्ह्यात पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

गडचिरोली जिल्ह्यात पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: खरीप पिकांचा हंगाम जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे. राज्यावर नेव्हे तर संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून सावरण्यासाठी प्रतेक जण प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना मात्र बांधावर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. शेतीची मशागत केली, तरच धान्य घरात येईल; अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतातून येणाऱ्या धान्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असते. पीक झालेच नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे रहाते. दरवर्षी संकटावर मात करून उन्हाळ्यात धान, कापूस, मिरची उत्पादन घेत आता परत एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कोरोनाच्या संकटातही हा शेतकरी काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज आहे.

Web Title: In Gadchiroli district, pre-sowing farming has gained momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती