गडचिरोली जिल्ह्यात वीज समस्येविरोधात गावकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:21 PM2018-07-14T13:21:14+5:302018-07-14T13:23:27+5:30

कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले.

In Gadchiroli District, villagers got off the road against electricity problem | गडचिरोली जिल्ह्यात वीज समस्येविरोधात गावकरी उतरले रस्त्यावर

गडचिरोली जिल्ह्यात वीज समस्येविरोधात गावकरी उतरले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देकोटगुल येथे चक्काजाम मंजूर वीज उपकेंद्र सहा वर्षानंतर झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :  कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले. भल्या पहाटे सुरू झालेल्या या आंदोलनात गावातील महिला-पुरूषांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही सहभागी झाले आहेत.
कोटगुल येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाले. मात्र आता सहा वर्षानंतरही ते सुरू न झाल्याने कोटगुलला वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोटगुलमधील नागरिकांनी शनिवारी सकाळपासून कोटगुल-मुरूमगाव, कोटगुल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोहम्बरे, कोरची पंचायत समितीचे उपसभापती श्रावण मातलाम, कोटगुलचे सरपंच राजेश नैताम, सोनपूरचे सरपंच नरपतसिंग नैताम, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी आणि परिसरातील बहुसंख्य युवक, महिला सहभागी झाले.
अतिसंवेदन नक्षलग्रस्त कोटगुल परिसरात दोन पोलीस मदत केंद्र तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन शासकीय आश्रमशाळा, ३१ जिल्हा परिषद शाळा आहेत, ७ ग्राम पंचायत असून ४० गावे आहेत. या परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरात महिन्यातून केवळ एक-दोन दिवस पुरवठा अखंडितपणे सुरू असतो, बाकीचे सर्व दिवस कधीही वीज पुरवठा खंडित होतो. याला कंटाळून या भागातील लोकांनी शनिवारी सकाळी सकाळपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला.
या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी आले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास या परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.

Web Title: In Gadchiroli District, villagers got off the road against electricity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज