चार राज्यातील अधिकारी गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:06 PM2019-03-13T23:06:41+5:302019-03-13T23:06:55+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक गुरूवारी गडचिरोलीत होणार आहे. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकारी येणार आहेत.

Gadchiroli four officers in the state | चार राज्यातील अधिकारी गडचिरोलीत

चार राज्यातील अधिकारी गडचिरोलीत

Next
ठळक मुद्देआज बैठक : नक्षलप्रभावित भागातील निवडणुकीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक गुरूवारी गडचिरोलीत होणार आहे. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकारी येणार आहेत.
नक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाच वेळी पहिल्या टप्प्यात (दि.११ एप्रिल) मतदान होणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात कारवाया करण्यास जाण्याची संधी मिळणार नाही. निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी कोणती रणनिती अवलंबिता येईल यावर चर्चा करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यांच्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट, छत्तीसगडमधील राजनांदगाव, बस्तर, जगदलपूर तेलंगणातील करीमनगर, आदिलाबाद या लगतच्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Gadchiroli four officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.