गडचिरोली स्थानकाला मिळणार ‘स्मार्ट लुक’

By Admin | Published: June 2, 2017 12:55 AM2017-06-02T00:55:56+5:302017-06-02T00:55:56+5:30

जिल्हा मुख्यालयाचे बस स्थानक म्हणून गडचिरोली बस स्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे.

Gadchiroli to get 'smart look' | गडचिरोली स्थानकाला मिळणार ‘स्मार्ट लुक’

गडचिरोली स्थानकाला मिळणार ‘स्मार्ट लुक’

googlenewsNext

३.५ कोटींचा खर्च : २० प्लॅटफॉर्मसह
विविध दुकानेही लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे बस स्थानक म्हणून गडचिरोली बस स्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यातून या बस स्थानकाला ‘स्मार्ट लुक’ मिळणार आहे. त्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत विभागीय नियंत्रक विनय गव्हाणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. बस स्थानकाच्या विस्तारीकरण कामात दोन्ही बाजुंनी प्लॅटफार्म आणि मध्ये स्टीलच्या खुर्च्याची बैठक व्यवस्था राहणार आहे. प्लॅटफार्मची संख्या २० होणार आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी औषधी दुकाने, एटीएम, फळांचे दुकाने, बुक स्टॉल आदी सुविधा राहणार आहेत. या कामाचे टेंडरिंग झाले असून दिवाळीपूर्वी कामाला सुरूवात होणार आहे.
आगार प्रमुख विनेश बावणे यांनी ेसांगितले की, गडचिरोली आगारात एकूण १०५ बसेस आहेत. त्यापैकी ४९ बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. ‘गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे एसटी’ या उक्तीअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात एसटी काम करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला बसस्थानक प्रमुख पी.एम. सालोडकर, वाहतूक निरिक्षक पी. आर. बासनवार, सहायक वाहतूक निरिक्षक एस.जे. राठोड आदी उपस्थित होते.

सिरोंचा डेपोचा प्रस्ताव
गडचिरोलीपासून लांब अंतर असलेल्या सिरोंचा येथे एसटी महामंडळाचे स्वतंत्र आगार (डेपो) द्यावे, असा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. हा डेपो झाल्यानंतर त्या भागातील तेलगू भाषिकांचे प्रमाण आणि तेलंगणा, आंध्रप्रदेशसोबत असलेले संबंध पाहता तिकडच्या भागात आंतरराज्यीय फेऱ्या वाढविल्या जाऊ शकतात. सध्या हैदराबादसाठी एकच बस सुरू आहे.

Web Title: Gadchiroli to get 'smart look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.