Gadchiroli Gram Panchayat : १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमाेजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 10:43 AM2022-10-18T10:43:19+5:302022-10-18T10:44:06+5:30

थेट जनतेतून हाेणार सरपंच : उमेदवारांसह मतदारांमध्येही उत्सुकता

Gadchiroli Gram Panchayat : Counting of 16 gram panchayats today | Gadchiroli Gram Panchayat : १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमाेजणी

Gadchiroli Gram Panchayat : १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमाेजणी

Next

गडचिरोली : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील एकूण १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर रोजी रविवारला मतदानाची प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतींमध्ये अंदाजे सरासरी ७४.९४ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीची मतमाेजणी १८ ऑक्टाेबर राेजी मंगळवारी तहसील कार्यालयात हाेणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून हाेणार असल्याने उमेदवारांसह मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

आठही तालुक्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. या ग्रामपंचायतींमध्ये एकूण २३ हजार ९९९ एवढे मतदार हाेते. यापैकी १७ हजार ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एटापल्ली तालुक्याच्या काेहका, देसाईगंज तालुक्यातील सावंगी, गांधीनगर, गडचिराेली तालुक्यातील पारडी कुपी, आरमाेरी तालुक्यातील जांभळी, भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम, येचली, मिरगुळवंचा व लाहेरी तसेच धानाेरा तालुक्यातील इरूपटाेला, मुरगाव, मुंज्यालगाेंदी, चामाेर्शी तालुक्यातील घाेट, दुर्गापूर आणि अहेरी तालुक्यातील आरेंदा व खांदला आदी ग्रामपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया रविवारला पार पडली.

एकूण १६ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदांसाठी २४२ उमेदवार रिंगणात हाेते, तर सरपंचाच्या १६ जागांसाठी एकूण ५३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

पाच ग्रामपंचायती झाल्या अविराेध

आठ तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक जाहीर करण्यात आली. यापैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक अविराेध पार पडली. यामध्ये धानाेरा तालुक्यातील लेखा, कामतळा, जप्पी तसेच आरमाेरी तालुक्यातील नरचुली आणि एटापल्ली तालुक्यातील काेटमी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Gadchiroli Gram Panchayat : Counting of 16 gram panchayats today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.