IAS शुभम गुप्तांनी सूड उगवला! बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले, आदिवासी महिलेची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

By संजय तिपाले | Published: August 20, 2024 02:40 PM2024-08-20T14:40:00+5:302024-08-20T14:40:21+5:30

Gadchiroli News: दुधाळ गाय वाटप योजनेते गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आयपीएस सांगली - मिरज - कुपवाडचे विद्यमान महापालिका आयुक्त व भामरागड येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरुध्द तक्रारींचा ओघ सुरुच आहे.

Gadchiroli: IAS Shubham Gupta takes revenge! Made homeless, implicated in a false crime, tribal woman complains to Chief Minister | IAS शुभम गुप्तांनी सूड उगवला! बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले, आदिवासी महिलेची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

IAS शुभम गुप्तांनी सूड उगवला! बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले, आदिवासी महिलेची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

- संजय तिपाले 
गडचिरोली - दुधाळ गाय वाटप योजनेते गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आयपीएस सांगली - मिरज - कुपवाडचे विद्यमान महापालिका आयुक्त व भामरागड येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरुध्द तक्रारींचा ओघ सुरुच आहे. १९ ऑगस्टला भामरागडातील एका आदिवासी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार स्वाक्षरी न केल्याने   बेघर करण्याची धमकी दिली, काही दिवसांनी खरोखरच माझा संसार रस्त्यावर आणला, मला खोट्यात गुन्ह्यात गोवले तर पतीला कार्यालयात बोलावून धमकावले, अशा आशयाची तक्रार भारती इष्टाम या महिलेने केली आहे.

भारती इष्टाम या भामरागडच्या रहिवासी असून त्यांच्याकडे गॅस एजन्सी आहे. शिवाय विविध सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. १९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शुभम गुप्तांवर गंभीर  स्वरुपाचे आरोप केले आहेत. एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व भामरागडमध्ये आदिवासी एकात्मिक प्रकल्प  अधिकारी असलेल्या आयएएस शुभम गुप्ता हे २०२१-२२ मध्ये भामरागड नगरपंचायतीचे प्रशासक देखील होते. भामरागड नगरपंचायत इमारतीसाठी ०.९९ हेक्टर जागा हस्तगत करण्यासाठी वनहक्क समितीचा ठराव आवश्यक होता. वनहक्क समितीवर मी देखील होते. या समितीच्या ठरावासाठी शुभम गुप्ता यांनी कार्यालयात बोलावले. सह्या व ठराव न दिल्यास उध्वस्थ करण्याची धमकी दिली.

मी विरोधावर ठाम राहिल्याने माझ्यावर त्यावेळचे तहसीलदार अनमोल कांबळे व नगरपंचायतीचे अधिकारी सूरज जाधव यांच्याकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याच दरम्यान माझ्या गॅस एजन्सीची तपासणी केली, त्यात काही न आढळल्याने मला जागा खाली करायला लावली. त्यानंतर वारंवार पत्र पाठवून मला त्रास देण्यास सुरुवात केली. या दरम्यान माझ्यावर कलम १०७ व कलम १११ अन्वये गुन्हा नोंद केला. शिवाय पतीला कार्यालयात बोलावून धमकावले. माझी मुले शिक्षणासाठी बाहेर होती, मानसिक ताणतणावात त्यांना मी पैसे पुरवू शकले नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटले, असेही पत्रात नमूद आहे.
 
... यापेक्षी लाजीरवाणी बाब नाही
भारती इष्टाम यांनी पत्रा नमूद केल्यानुसार , मी शुभम गुप्तांविरोधात अनेकांकडे दाद मागितली, उंबरठे झिजवले, पण न्याय मिळाला नाही. मला बेघर करुन, खोट्या गुन्ह्यात गोवून सूड उगविणाऱ्या गुप्तांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एका अदवािसी महिलेची हालअपेष्टा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाट्याला असा वाईट अनुभव येत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी बाब नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
गुप्ता म्हणतात, माझी काहीच प्रतिक्रिया नाही 
यासंदर्भात आयएएस शुभम गुप्ता यांना संपर्क केला असता मला याबाबत काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे आता या तक्रारीची शासन स्तरावरून शहानिशा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Gadchiroli: IAS Shubham Gupta takes revenge! Made homeless, implicated in a false crime, tribal woman complains to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.