गडचिरोलीत पारा घसरला ६.४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:45 PM2018-12-31T22:45:15+5:302018-12-31T22:45:40+5:30
आॅक्टोबरच्या अखेरीस सुरू झालेली हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मात्र चांगलीच हुडहुडी भरवत आहे. या थंडीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला चांगलाच कहर केला. सोमवारी यावर्षीचे सर्वात कमी तापमान (६.४ अंश) नोंदविल्या गेले. अंग गारठून टाकणाऱ्या या थंडीतही युवा वर्गात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह कमी झाला नसल्याचे चित्र सोमवारी रात्री सर्वत्र दिसत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅक्टोबरच्या अखेरीस सुरू झालेली हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मात्र चांगलीच हुडहुडी भरवत आहे. या थंडीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला चांगलाच कहर केला. सोमवारी यावर्षीचे सर्वात कमी तापमान (६.४ अंश) नोंदविल्या गेले. अंग गारठून टाकणाऱ्या या थंडीतही युवा वर्गात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह कमी झाला नसल्याचे चित्र सोमवारी रात्री सर्वत्र दिसत होते.
जिल्ह्याच्या मोठ्या भुभागाला जंगलाने वेढले असल्याने ग्रामीण भागात थंडीची तीव्रता जास्त असते. परंतू काहीशी विरळ वस्ती असलेल्या गडचिरोली शहरातही बोचºया थंडीने सर्वांना गरम कपड्यांसोबतच शेकटीचा आसरा घेण्यासाठी प्रवृत्त केले. शेकोटीच्या आसºयाने चौकाचौकात गप्पांचे फड रंगत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत होते. वयोवृद्ध नागरिकांना मात्र आपल्या घरातच शेकटी पेटवून ऊब घ्यावी लागत आहे.
सोमवारी सायंकाळी थंडीमुळे आणि ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी बाजारपेठ लवकरच बंद झाली होती. मात्र ठिकठिकाणी पार्ट्यांची लगबग सुरू होती.
स्वयंपाकघरातील कामे उन्हात
सकाळची वेळी तमाम गृहिणी स्वयंपाकघरातील कामांमध्ये व्यस्त असतात. पण वातावरणातील गारव्यामुळे स्वयंपाकघरात राहणे कठीण होत असल्याने महिलावर्ग शक्य ती कामे उन्हात बसून करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारी काही गृहिणींनी तर चक्क आपल्या अंगणात गॅस सिलींडर आणून उन्हाची ऊब घेत स्वयंपाक उरकला.
रुग्णालयात वाढतेय गर्दी
थंडीचा कडाका काही जणांसाठी असह्यहोत आहे. त्यातून सर्दी, खोकल्याचा त्रास वाढला आहे. विशेषत: ५ वर्षाखालील बालकांना हा त्रास अधिक जाणवत असून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.
शाळकरी मुलांच्या पालकांची कसरत
शाळकरी मुलांना सकाळच्या थंडीत अंथरूणातून बाहेर काढून शाळेची तयारी करताना पालकवर्गाला कसरत करावी लागत आहे. सकाळ पाळीतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झाल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.