गडचिरोलीत नक्षलींचा पुन्हा धुमाकूळ, तलवाडा येथील लाकूड डेपो जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:45 AM2018-05-19T10:45:03+5:302018-05-19T10:45:03+5:30

मागील महिन्यातील चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारल्या गेल्यानंतर चिडलेल्या नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.

In Gadchiroli, the Naxalites were burnt again in Dhumalakul, Talwada, Wood Depot | गडचिरोलीत नक्षलींचा पुन्हा धुमाकूळ, तलवाडा येथील लाकूड डेपो जाळला

गडचिरोलीत नक्षलींचा पुन्हा धुमाकूळ, तलवाडा येथील लाकूड डेपो जाळला

Next

आलापल्ली - मागील महिन्यातील चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारल्या गेल्यानंतर चिडलेल्या नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल मध्यरात्रीनंतर काही नक्षलवाद्यांनी  तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली. याशिवाय आलापल्ली ते भामरागड या मुख्य मार्गावर काही ठिकाणी रस्त्यात झाडे आडवी टाकून वाहतूक अडविली आहे. 

आलापल्ली पासून 12 किलोमीटरवर असलेल्या तलवाडा या गावाजवळील आलापल्ली वनपरिक्षेत्राचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास जाळला. यावेळी तिथे एक बॅनरसुद्धा लावले असून त्यात वनविभाग आणि पोलीस  विभागाचा निषेध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या डेपोत मोठ्या प्रमाणात बिट म्हणजेच जळाऊ लाकूड उपलब्ध आहे. या आगीत अंदाजे 23 बिट जळाले असून जवळपास 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळपासून आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील हे स्वतः तिथे हजर असून आग नियंत्रनात आली आहे. तसेच तलवाडापासून सुमारे 2 किमी अंतरावर मुख्य मार्गावर एक झाड पाडून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथे पण एक लाल कापडी बॅनर लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर याच मार्गावर भामरागडच्या अलिकडे ताडगावजवळही अशाच प्रकारे झाड पाडून बॅनर लागले आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूक बंद आहे. जंगल परिसर असल्याने गेलेल्या गाडया लगेच परत येत आहेत.

Web Title: In Gadchiroli, the Naxalites were burnt again in Dhumalakul, Talwada, Wood Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.