गडचिरोलीचे खुले कारागृह होणार आता ‘स्मार्ट’

By Admin | Published: February 6, 2016 01:32 AM2016-02-06T01:32:33+5:302016-02-06T01:32:33+5:30

दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलीत सुरू झालेले खुले कारागृह चुणचुणीत, कुशल आणि स्मार्ट, अद्ययावत बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Gadchiroli to open an open jail | गडचिरोलीचे खुले कारागृह होणार आता ‘स्मार्ट’

गडचिरोलीचे खुले कारागृह होणार आता ‘स्मार्ट’

googlenewsNext

अनेक उपक्रम सुरू : कारागृह अधीक्षकांचा पुढाकार
ंंगडचिरोली : दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलीत सुरू झालेले खुले कारागृह चुणचुणीत, कुशल आणि स्मार्ट, अद्ययावत बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या कारागृहातील कैदी शिक्षा भोगून जगात बाहेर आल्यावर तो जगाशी स्पर्धा करू शकेल, अशी त्याची तयारी कारागृहातच करून दिली जाणार आहे.
सदर कारागृहात सोलर सिस्टीमच्या भरवशावर पथदिवे लावले जाणार आहे. याशिवाय स्वयंपाकही सोलर कुकरवर तयार करून इंधनाची बचत करण्याचा संकल्प कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी सोडलेला आहे, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. या कारागृहात कमीतकमी खर्चात कैद्यांना लघु उद्योगाच्या माध्यमातून ईस्त्री व झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. कारागृहात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या भरवशावरच भाजीपाल्याची शेतीही फुलविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मत्स्यपालनाचे कामही लवकरच सुरू होईल. (प्रतिनिधी)

स्मार्ट जेलची अशी आहे संकल्पना
कारागृहातील कैद्यांना स्मार्ट बनविण्यासाठी योगा, तोंडी व्याख्यान, आध्यात्मिक प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यास दौरा, आधुनिक तंत्रज्ञान, जाणीव जागृती, कैद्यांना इलेक्ट्रिकबाबत प्रशिक्षण, संभाषण तंत्रज्ञान प्रशिक्षण, स्मार्ट कृषी अंतर्गत प्रशिक्षण, झाडू तयार करणे, लॉड्री प्रशिक्षण, कारागृहात स्मार्ट सौर पथदिवे, स्मार्ट वॉटर सिस्टीम, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, स्मार्ट स्वयंपाकगृह, स्मार्ट ग्रंथालय, कृषी प्रशिक्षण, कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आदींची सुविधा कारागृहात राहणार आहे.

Web Title: Gadchiroli to open an open jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.