राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीचे खेळाडू चमकले
By admin | Published: May 21, 2016 01:20 AM2016-05-21T01:20:41+5:302016-05-21T01:20:41+5:30
शोतोकान कराटे संघातर्फे आयोजित पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटे पटूनी तीन सुवर्ण, ...
पदकांचा पाऊस : पाच वर्षीय आरोहीलाही घवघवीत यश
गडचिरोली : शोतोकान कराटे संघातर्फे आयोजित पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटे पटूनी तीन सुवर्ण, दोन रजत आणि एक कास्य पदक प्राप्त केले असून राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिरातही चमकदार कामगिरी केली आहे.
पुणे येथे आयोजित शोतोकान कराटे संघाकडून राष्ट्रीय कराटे स्पर्धा आणि राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात कराटे पटूनी सहभाग घेतला होता. गडचिरोलीचे कराटे पटूनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या राष्ट्रीय कराटे
स्पर्धेत गडचिरोलीचे ओम पोरेटी याने कांता या स्पर्धेत सुवर्ण पदक तर फाईटमध्ये कांस्यपदक पटकाविले, चेतन लोहकर यांनी सुवर्ण आणि रजत पदक, महेश मेश्राम सुवर्ण तर सचिन उइके यांनी रजत पदक मिळविले या स्पर्धेत उत्कृष्ट फाइटर म्हणून चेतन लोहकरे याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत गडचिरोलीची पाच वर्षीय आरोही चव्हान हिने फाईट मध्ये रजत पदक प्राप्त केले. तसेच कराटे प्रशिक्षण शिबिरातही गडचिरोलीच्या कराटे पटूनी चमकदार कामगिरी केली.कराटे
पटूच्या यशाबद्दल कराटे असोशिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी कराटे पडूचे अभिनंदन केले. कराटेपटूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक योगेश चव्हाण आणि आई- वडिलांना दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)