काेराेना लसीकरणात गडचिरोली राज्यात २३ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:25+5:302021-02-05T08:55:25+5:30
पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचारी, आराेग्याशी संबंधित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व त्यांचे कर्मचारी यांना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले ...
पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचारी, आराेग्याशी संबंधित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व त्यांचे कर्मचारी यांना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते. या सर्व संस्थांमधील ९ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांची काेराेना लसीसाठी नाेंदणी करण्यात आली. पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला. गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, अहेरी या चार केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीच्या कालावधीत लसीकरणात अनेक अडचणी येत असल्याने अपेक्षेएवढे लसीकरण हाेऊ शकले नाही. काही आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीच्या कालावधीत भीती पसरल्याने आराेग्य कर्मचारी लस घेण्यास तयार हाेत नव्हते. काही दिवसांनंतर या लसीची भीती दूर हाेऊ लागली. त्यामुळे आता लसीकरणाला गती मिळाली आहे.
काेराेना लसीकरणाचा राज्याच्या आराेग्य विभागाने आढावा घेतला असता, गडचिराेली जिल्हा २३ व्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. काही जिल्हे गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत अतिशय माेठे आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. त्यामुळे अधिकची केंद्रनिर्मिती करून लस दिली जात आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून, या जिल्ह्यात १७ हजार ८४२ आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे.
बाॅक्स....
तीन तालुक्यांत वाढले केंद्र
सुरुवातीला गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, अहेरी या चारच ठिकाणी काेराेनाची लस दिली जात हाेती. संबंधित तालुक्यातील आराेग्य कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन लस घेत हाेते. या तालुक्यांमधील जवळपास सर्वच आराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आता देसाईगंज, कुरखेडा, धानाेरा या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्या तालुक्यांमधील आराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणचे केंद्र बंद करून दुसऱ्या तालुक्यांमध्ये केंद्र सुरू केले जाणार आहे.
बाॅक्स....
१० हजार लस पुन्हा उपलब्ध
गडचिराेली जिल्ह्यातील ९ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार लस उपलब्ध झाल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला दाेन याप्रमाणे सहा हजार कर्मचाऱ्यांना लस मिळणार हाेती. ३ हजार ९६६ कर्मचारी पुन्हा लसीच्या प्रतीक्षेत हाेते. केंद्र शासनाने पुन्हा १० हजार लस उपलब्ध करून दिल्या आहेत. यातून उर्वरित सर्वच कर्मचाऱ्यांना लस मिळणार आहे. आता जिल्ह्याला एकूण २२ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत.
कुठे किती लसीकरण?
गडचिराेली ८८१
कुरखेडा ४१७
अहेरी ४८५
चामाेर्शी ७१३
धानाेरा २९९
देसाईगंज ३०७
आरमाेरी ५९०
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
चंद्रपूर ३३४६
भंडारा २३१०
गाेंदिया २२३१
नागपूर ८०८५
काेट
दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या १० हजार लसींमुळे सर्वच आराेग्य कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध हाेणार आहे. लस देण्याची गती वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविली जात आहे. लवकरच सर्व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध हाेईल.
-डाॅ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली