गडचिरोलीत आतापर्यंत 1058 कोरोनाबाधित;चामोर्शीत 43 नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:22 PM2020-08-28T19:22:21+5:302020-08-28T19:22:37+5:30
चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली असता त्यात 43 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
गडचिरोली: चामोर्शी नगरात कोरोनाच्या सामूहिक संसर्ग झाल्याने जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1000 च्या पलीकडे गेला. दिवसभरात 66 नवीन रुग्णांची भर पडली.
चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली असता त्यात 43 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तर गडचिरोली येथे आज 16 नवीन कोरोना बाधित आढळले. यामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून 1, चामोर्शी येथून आलेला 1, रामनगर येथील 4, सामान्य रूग्णालयतील 7 यामध्ये कनेरी येथील एक, शिवनी येथील 1, चणकाईनगर येथील रुग्णालयात दाखल असलेला 1 असे 16 जण, विसोरा वडसा येथील 1 एसआरपीएफ, धानोरा येथील KGBV शाळेतील 1 स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील 4 व कुरखेडा येथील 1 असे मिळून आज 66 नवीन बाधित मिळाले.
तसेच आज 12 जण कोरोनामूक्त झाले. त्यात गडचिरोली येथील 1 स्थानिक व 3 पोलीस, अहेरीचे 4 जण यात एकजण कर्करोगाने ग्रस्त होता त्याने कोरोनवार मात केली. भामरागड येथील 2 पोलीस तर चामोर्शी मधील 2 स्थानिकांनी कोरोनावर मात केली.
यामुळे जिल्हयातील क्रियाशील कोरोना बाधितांची आकडेवारी 206 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 851 तर आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधित संख्या 1058 झाली.