गडचिरोलीत विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवून वणवा विझवला; शाळेची इमारत सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:41 PM2018-03-29T15:41:31+5:302018-03-29T15:41:42+5:30

जिल्ह्यातल्या रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमागे रचून ठेवण्यात आलेल्या जळाऊ लाकूड बिटाला वेढलेल्या वणव्याच्या आगीला विझवण्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवल्याने शाळेची इमारत वाचविण्यात त्यांना यश आले.

Gadchiroli students get control over fire; The school building is safe | गडचिरोलीत विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवून वणवा विझवला; शाळेची इमारत सुरक्षित

गडचिरोलीत विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवून वणवा विझवला; शाळेची इमारत सुरक्षित

Next
ठळक मुद्देजंगलातील आगीत एक ट्रक लाकूड खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातल्या रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमागे रचून ठेवण्यात आलेल्या जळाऊ लाकूड बिटाला वेढलेल्या वणव्याच्या आगीला विझवण्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवल्याने शाळेची इमारत वाचविण्यात त्यांना यश आले. ही घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
ही आश्रमशाळा गावाच्या एका बाजूला व जंगलाच्या अगदी जवळ आहे. गुरुवारी दुपारी जंगल व शेतात लागलेला वणवा पसरत पसरत येऊन शाळेच्या मागे ठेवलेल्या लाकडाच्या बिटाला लागला होता. ही गोष्ट लक्षात येताच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तात्काळ धाव घेऊन मिळेल तिथून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे दोन तास खपून विद्यार्थ्यांनी ही आग विझवली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर शाळेच्या इमारतीलाही तिने गिळंकृत करण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महाले, सरपंच केरामी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. जंगलात लागलेल्या या वणव्यात एक ट्रक लाकूड जळून खाक झाले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Web Title: Gadchiroli students get control over fire; The school building is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.