गडचिरोली: कुरखेडात संशयास्पद स्थितीत आढळला २६ वर्षीय युवतीचा मृतदेह; जिल्हा परिषद शाळेजवळील घटना

By दिगांबर जवादे | Published: August 24, 2024 11:17 AM2024-08-24T11:17:07+5:302024-08-24T11:27:04+5:30

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

Gadchiroli The body of a 26-year-old girl was found in a suspicious condition in Kurkheda | गडचिरोली: कुरखेडात संशयास्पद स्थितीत आढळला २६ वर्षीय युवतीचा मृतदेह; जिल्हा परिषद शाळेजवळील घटना

गडचिरोली: कुरखेडात संशयास्पद स्थितीत आढळला २६ वर्षीय युवतीचा मृतदेह; जिल्हा परिषद शाळेजवळील घटना

दिगांबर जवादे, गडचिरोली: कुरखेडा जिल्हा परिषद कन्या शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ शनिवारी (२४ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका २६ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम असे मृत युवतीचे नाव आहे.

शनिवारी सकाळी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या मुलाना संरक्षण भिंतीला लागून युवतीचा मृतदेह दिसला. याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली. पोलिसांना घटनेची सूचना मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळाकडे धाव घेतली.

घटनास्थळाचा पंचनामा करुन युवतीचा मृतदेह ताब्यात घेवून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर स्पष्ट होईल.

Web Title: Gadchiroli The body of a 26-year-old girl was found in a suspicious condition in Kurkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.