सांघिक खेळात गडचिरोली अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:41 AM2017-12-30T00:41:56+5:302017-12-30T00:42:08+5:30

आदिवासी विकास विभागीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर पार पडले. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्प सांघिक खेळात अव्वल ठरला.

Gadchiroli tops in team game | सांघिक खेळात गडचिरोली अव्वल

सांघिक खेळात गडचिरोली अव्वल

Next
ठळक मुद्देअनेक खेळाडू चमकले : आदिवासी विकास नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभागीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर पार पडले. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्प सांघिक खेळात अव्वल ठरला.
क्रीडा स्पर्धेत भामरागड प्रकल्पाने सलग अकराव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. देवरी प्रकल्प उपविजेता ठरला. तर गडचिरोली प्रकल्प तिसºया क्रमांकावर राहिला. वैयक्तिक खेळात भामरागड प्रकल्पाने सर्वांना मागे टाकले. परंतु सांघिक खेळात गडचिरोली प्रकल्पाने सर्वाधिक १८० गुण पटकाविले. भामरागड प्रकल्पाला सांघिक खेळात १४० गुण, उपविजेता देवरी प्रकल्पाला १३० गुण, वैयक्तिक खेळात भामरागड प्रकल्पाला २३७ गुण, देवरीला १३५ गुण व गडचिरोली प्रकल्पाला ६६ गुण मिळाले. अकरावेळा अखंडीत विजेतेपद पटकाविलेल्या भामरागड प्रकल्पाने सांघिक व वैयक्तिक खेळात सर्वाधिक ३७८ गुण पटकाविले. देवरीला २६५ गुण तर गडचिरोली प्रकल्पाला २४६ गुण मिळाले. या स्पर्धेत आठ प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या २ हजार ४०० खेळाडूंनी भाग घेतला. १४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींचे कबड्डी, खो- खो, व्हॉलिबॉल, हँडबॉलचे असे एकूण २४ सामने झाले. यामध्ये १२ सामन्यांत गडचिरोली प्रकल्पाने प्रथम, सात सामन्यांत द्वितीय क्रमांक पटकाविला. १४ वर्षाखालील मुले-मुलींच्या कबड्डी, खो-खो, हँडबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील मुलींच्या हँडबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच १९ वर्षाखालील मुलांनी चारही सांघिक खेळात प्रथम क्रमांक, १९ वर्षाखालील मुलींनी कबड्डीमध्ये प्रथम, १७ वर्षाखालील मुलांनी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल सामन्यात द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलींनी खो-खो व व्हॉलिबॉलमध्ये द्वितीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुलींनी खो-खो, व्हॉलिबॉलमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. १४ व १७ वर्ष मुलांच्या १०० मीटर रिले स्पर्धेत गडचिरोली प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर १४ वर्ष मुलींच्या रिले स्पर्धेत गडचिरोली प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तिक खेळातही या प्रकल्पाचे अनेक खेळाडू चमकले.
अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या नियंत्रणाखाली स्पर्धा पार पडल्या. यशाबद्दल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, अधीक्षक डी. के. टिंगुसले, ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, डब्ल्यू.टी. राऊत, छाया घुटके, किशोर वाट, सुधाकर गौरकर, संदीप दोनाडकर, सुधीर शेंडे, अनिल सोमनकर, आर. टी. निंबोळकर आदींनी खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले आहे.

Web Title: Gadchiroli tops in team game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.